अकोले तालुक्यातील ३१ वाड्यांना टॅन्करने पाणी पुरवठा - उपसभापती मारुती मेंगाळ

Image result for टॅंकरने

अकोले (प्रतिनिधी)अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गमभागासहित बागायती भागात देखिल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभिर बनला असुन टंचाईग्रस्त गावांमधिल ३१ वाड्यांना ६ टॉंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती उपसभापती मारुती मेंगाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे ....
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि तालुक्यातील टंचाईग्रस्त मुथाळने गावातील पागिरवाडी ,नायकरवाडी, कानडवाडी, केळी रुम्हणवाडी-,गावठाण, मधलीवाडी,
सुपलिचीवाडी,परदेशवाडी, देवठाण- माशेरेवाडी, उघडेवाडी, पथवेवाडी, गिर्हेवाडी, गागंडवाडी, खडकेवाडी, देवाचीवाडी मन्याळे- गावठाण,गवारवाडी,पिरसाईवाडी माळवाडी,पिसेवाडी,गारवाडी,केळीओतुर- डोंगरवाडी,हांडेवाडी,पाचनई -गावठाण,धामणगाव आवारी-बोरदरा ,लिंगदरा,मधेवाडी,उडदावणे- पायरवाडी,गागंडवाडी,फनसवाडी,कांटनवाडी,लिंगदेव- फापाळेवाडी,ठाकरवाडी,संग्रामनगर,
वडशेत, या गावांमधल्या ३१ वाड्यांना ६ टॉंकरने सध्या तालुक्यात पाणी पुरवठा सुरु आहे सबंधित गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील ५ विहिरी तसेच ३ बोअर अधिग्रहण करण्या आले असुन पिंपळदरी खंडोबावाडी,वाघदरी,जाभंळदरा,गुरुकुल,बर्डेवाडी, कळंब - गावठाण ,परतनदरा, बदगी- गावठाण ईत्यादी गावांना टॉंकर मंजुर झालेअसुन तातडीने या संबंधित गावांना टॉंकर ने पाणी पुरवठा होणार असुन घोडसरवाडी,अंबित कळकिचीवाडी पिंपरवाडी,धामणगाव आवारी सुळघाट,तळेवाडी,
जांभुळवाडी घोरपडवाडी या गावांचे टॉंकर साठी प्रस्ताव प्राप्त झाले असुन या देखील गावांना लवकरात लवकर टॉंकरने पाणी पुरवठा होणार असुन तालुक्यातील टंचाईवर मातकरण्यासाठी पंचायत समितीचे प्रशासन जोमाने काम करत असुन तालुक्यातील ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या गावांचे प्रस्ताव ग्रामसेवकांमार्फत पंचायत समिती कडे सादर करण्याचे आवाहन उपसभापती मारुती मेंगाळ यांनी केले आहे

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget