पवारांचा आणखी एक नातू रणांगणात, रोहित पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं!


पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. स्वत: रोहित पवार यांनी यासंदर्भात ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत केली. आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून, अद्याप मतदारसंघ ठरला नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. पवार कुटुंबातील असल्याने मोठं राजकीय वलय त्यांना आहे. मात्र, रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार, याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.

तसेच, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्र्वादी आघाडीला 23 जागा मिळतील, असा अंदाज रोहित पवार यांनी वर्तवला आहे.

राज्यात दुष्काळ भयानक परिस्थिती आहे. पुण्यात पाण्याचं योग्य नियोजन नाही. नियोजन अभावी पाणी टंचाई आहे, असे म्हणत रोहित पवार पुढे म्हणाले, “जलयुक्त शिवार अभियानाचं यश दाखवण्यासाठी जामखेडला गरज असताना कमी टँकरनं पाणी दिलं जात आहे.”
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget