पुण्यात भररस्त्यात गोळ्या झाडून कोयत्याने वार करत गुंडाची हत्या !

पुणे :- एका सराईत गुन्हेगारावर हल्ला चढवत अज्ञातांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून पुणे सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भररस्त्यात एकाचा खून केल्याची घटना घडली आहे.
हसन शेख असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हसन शेखवर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

भर दुपारी, भर रस्त्यात हा थरार रंगला,गुरुवारी दुपारी ही घटना नारायणपूर येथे घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

आज सकाळी हसन शेख हा नारायणपुर येथून त्याच्या कारने जात होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांच्या एका बोलेरोने त्याच्या कारला धडक दिली.

त्यानंतर त्याच्यावर गोळीबार केला. २ गोळ्या झाडल्या. त्यानंतर हसन शेखला गाडीतून बाहेर काढून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. 


या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला करुन मारेकरी पसार झाले.

सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.


दरम्यान हसन शेखवर यापूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता. 2015 मध्ये त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. 

त्यावेळी तो गंभीर जखमी झाला होता. त्या हल्ल्यातून बचावलेला हसन शेख काही दिवस कोमात होता. 

गेल्या काही दिवसांपासून तो हॉटेल व्यवसाय करत होता. मात्र आज त्याच्यावर पुन्हा हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget