इलेक्शन ड्युटीवेळी मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू


मुंबई : मुंबईतील मंत्रालयातील सांस्कृतिक विभागात काम करणाऱ्या 32 वर्षीय कर्मचारी प्रीती धुर्वे यांचा आज मृत्यू झाला. लोकसभा निवडणुकीदरम्यान बरं नसतानाही निवडणुकीचे काम लावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रीतीच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रीतीच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात 29 एप्रिलला मुंबईत मतदान पार पडलं. यावेळी प्रीती धुर्वे यांना मंत्रालयातून शिवडी विधानसभा मतदारसंघात इलेक्शनची ड्युटी लावली होती. मात्र 19 एप्रिलला प्रीती यांची तब्येत बिघडली. त्यावेळी त्यांना कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रीती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुट्टी मिळावी यासाठी अर्ज केला होता. मात्र शिवडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी त्यांची ही रजा मंजूर केली नाही. रजा मंजूर न झाल्याने प्रीती यांनी 10 दिवस उन्हात काम केले, असं प्रीती यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.

मात्र मतदानावेळी म्हणजेच 29 एप्रिलला प्रीतीला जास्त अस्वस्थ वाटू लागले. यामुळे ऑन ड्यूटी असताना प्रीती यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना नायर रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget