अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने आईनेच काढला पोटच्या मुलाचा काटा!


सातारा : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पोटच्या मुलाचा आईनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील वाई येथे घडली आहे. याप्रकरणी वाई पोलिसांनी आई अश्विनी प्रकाश चव्हाण आणि तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाईतील गंगापूर येथील 10 वर्षीय रोहन (नाव बदलेले) आई अश्विनीसोबत राहत होता. मागील महिन्यात २८ एप्रिल रोजी रात्री रोहन एक कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र, तेव्हापासून ते बेपत्ता असल्याची तक्रार आई अश्विनीने पोलिसात दिली होती. मात्र, त्यानंतर रोहनचा मृतदेह तेथील धोम धरणाच्या कालव्यात सापडला.

यानंतर पोलिसांनी कार्यक्रम पाहायला गेलेला रोहन अचानक बेपत्ता होणे व नंतर त्याचा मृतदेह कालव्यापर्यंत कसा गेला असा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर पोलिसांनी आई अश्विनीची कसून चौकशी केली असता, तिने प्रियकर सचिन कुंभार याच्या मदतीने पोटच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

अश्विनी आणि सचिन कुंभार हे दोघेही वाईतील एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. पण या दोघांच्या प्रेमसंबंधात अश्विनीचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे अश्विनीने सचिनच्या मदतीने मुलाचा काटा काढायचा ठरवले. त्यानुसार 28 एप्रिलला अश्विनी व सचिनने रोहनला रात्री साडेदहाच्या सुमारास धोम धरणाच्या कालव्याजवळ नेले. त्याच्या आईने त्याला सरबतात गुंगीचे औषध दिले. रोहन बेशुद्ध होताच सचिनने त्याला पाण्यात ढकलले. यानंतर दोघेही घरी गेले. यानंतर आई अश्विनीने मुलगा रोहन बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिसी खाक्यामुळे तिने अनैतिक संबंधात मुलाचा अडसर होत असल्याने रोहनची हत्या प्रियकराच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget