आईसोबत संबंध असल्याचा राग, अल्पवयीन मुलाकडून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या


वर्धा : अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आलाय. सकाळच्या सुमारास मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असून अवघ्या काही तासात आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपींनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास हत्या करत दिवसभर मृतदेह घरी ठेवत रात्री विल्हेवाट लावली.

मृत युवक हा हमालीचं काम करत होता. युवकाला दारूचं व्यसन असल्याचं बोललं जातंय. यातच त्याचं गावातील एका महिलेसोबत सुत जुळलं. या महिलेच्या घरी हा नेहमी येत-जात असायचा. ही महिला सुद्धा दारूच्या आहारी गेली असल्याचं बोललं जातंय. यातच यांचे शाब्दिक वाद व्हायचे. या अनैतिक संबंधाची माहिती महिलेच्या पतीसह मुलाला लागली. महिलेच्या पतीने युवकाला पत्नीपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. मात्र युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget