माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारु, करणी सेनेची जावेद अख्तर यांना धमकी


मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांना राजस्थानच्या राजपूत करणी सेनेने धमकी दिली आहे. जावेद अख्तर यांनी केवळ बुरखाच नव्हे तर राजस्थानातील घुंघटवरही बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यावरुन करणी सेनेने ही धमकी दिली. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर तिकडे बुरखाबंदी करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून भारतातही बुरखा बंदीची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत जावेद अख्तर यांनी केवळ बुरखाच नव्हे तर घुंघटवरीही बंदी घाला असं म्हटलं होतं.

जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर करणी सेनेने त्यांना धमकी दिली. करणी सेनेचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जीवन सिंह सोळंकी यांनी पत्र प्रसिद्ध केलं आहे. बुरखा हा दहशतवादाशी जोडला आहे. मात्र घुंघटचा त्याच्याशी संबंध नाही. त्यामुळे जावेद अख्तर यांनी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरं जावं, अशी धमकी सोळंकी यांनी दिली आहे. जर तुम्ही माफी मागितली नाही, तर तुमच्या घरात घुसून मारु, असंही या पत्रात म्हटलं आहे. या पत्रासोबत व्हिडीओ रेकॉर्डिंगही पाठवण्यात आलं आहे.

जावेद अख्तर यांनी या धमकीनंतर ट्विट करुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “काही लोक माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा लावत आहेत. मी म्हटलं होतं की सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेत बुरखाबंदी केली असावी, मात्र वास्तविक पाहता, हे महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे. चेहरा झाकणे बंद करायला हवं. मग तो बुरखा असो किंवा घुंघट”, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget