शिसोदे सर यांना सेवारत्न पुरस्कार प्रदानसंगमनेर (प्रतिनिधी) नाशिक येथील प्रगती महिला सामाजिक विकास संस्थेच्या वतीने दिला जाणारा डॉ, बाबासाहेब आंबेडकर सेवा रत्न पुरस्कार संगमनेरचे कलाशिक्षक अशोक प्रल्हाद शिंसोदे यांना नाशिकचे माजी महापौर बाळासाहेब सानप यांचे हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

आपल्या कलेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सेवा देणारे शिसोदे सर यांनी असंख्य विद्यार्थी घडविले .नाशिक येथे विविध शैक्षणिक संस्थात चित्रकला, हस्तकला व हस्ताक्षर सुधारणा या विषयावर त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले आहे, सध्या शिसोदे हे साईबाबा विश्वस्तसंस्थेत कार्यरत असून त्यांच्याहस्तकलेचे सर्वत्र कौतुक होत आहे, गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या सेवेची दखल घेवून शिसोदे यांना नुकताच सेवारत्न पुरस्कार देवून नाशिक येथे गौरविण्यात आले, यावेळी माजी महापौर बाळासाहेब सानप, महिला विकास संस्थेच्या जया वाघ यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते,कलेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देण्याचे गेल्या अनेक वर्षांचे कार्य कौतुकास्पद असून विविध सामाजिक संघटनांची त्यांची जवळीक आहे गेल्या अनेक वर्षापासून संगमनेर पाटी च्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, सामाजिक योगदान देण्याचे त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने लोकप्रिय होत आहे शिसोदे सर कलाशिक्षक असले तरी त्यांचे कार्याची ओळख लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे, ज्येष्ठ नागरिक असूनही ते आजही संगमनेर शिर्डी असा प्रवास दुचाकी वरून करतात, श्री साईबाबा संस्थानमध्ये ते आपली सेवा आजही देत आहे संगमनेरच्या कला क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद आहे, संगमनेर पाटी, साई मंदिर, माळीवाडा येथील सुचना फलक यांसह विविध फलकांवर मजकूर लिहून आपली सेवा देत असतात ,विशेषतः हस्ताक्षर सुधारणा हा त्यांचा आवडता विषय आहे, शिसोदे सर हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे कलाक्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या शिसोदे सरांना सेवारत्न पुरस्कार मिळाल्याने विविध मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले आहे

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget