रामदास आठवले लातूरच्या दुष्काळ दौ-यावर


औसा : ज्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही त्यांना विमा रक्कम मिळवून देणार तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडविणार असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांना दिले. लातूरमधील औसा तालुक्यातील गावांना पुरेसा वीजपुरवठा करण्याच्या सूचना देण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सोडविणार असेही आठवलेंनी सांगितले.

लातूरच्या औसा तालुक्यातील जयनगर येथे आठवलेंच्या शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. दुष्काळग्रस्त शेतकरी संवादाचे आयोजन येथील भाजपचे शेतकरी नेते सूर्यकांत शिंदे यांनी केले होते. यावेळी रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, बाबासाहेब कांबळे, बाबुराव शिखरे, देविदास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. दुष्काळग्रस्त शेतकरी संवादाच्या या कार्यक्रमात औसा तालुक्यातील 10 गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.


रामदास आठवले हे तीन दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर असून त्यांनी नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड मार्गे आज लातूर जिल्ह्याचा दौरा केला. लातूरमध्ये त्यांनी जिल्ह्यात अनेक गावांना भेटी दिल्यानंतर औसा तालुक्यात जयनगर येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget