काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी बेपत्तापणजी : गोव्यातील काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी पीडित तरुणी अचानक बेपत्ता झाली आहे. गोवा पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, पीडित तरुणीला शोधण्यासाठी गोवा पोलिसांनी मोहीमही हाती घेतली आहे.

2016 साली पणजी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून अटानासियो मोनसेरेट उमेदवार होते. त्यांच्यावर तरुणीने बलात्कार आणि ड्रग्ज देण्याचा आरोप केला होता. आरोप करणारी तरुणी आता बेपत्ता झाली आहे. ज्यावेळी तरुणीने काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप केला होता, त्यावेळी पीडित तरुणी अल्पवयीन होती.

बलात्कार प्रकरणाचा खटल्याच्या प्रतिक्षेत असणारी पीडित तरुणी गोव्यातील ननद्वारे चालवल्या जाणाऱ्या पुनर्वसन गृहात राहत होती. तिथून 28 एप्रिल रोजी पीडित तरुणी बेपत्ता झाली, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

वेरना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी पीडित तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ननकडून आधी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, 10 मे रोजी पोलिसांनी या तक्रारीला अपहरणामध्ये बदललं. गोवा पोलिसांकडून पीडित तरुणीचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget