औटी कुटुंबाला उदयनराजे आणि बच्चू कडूंकडून मदत


श्रीगोंदा प्रतिनिधी

श्रीगोंदा शहरातील औटीवाडी परिसरात वास्तव्यास असणारे,रामदास हौसराव औटी हे आपला मुलगा व तीन मुलींना सांभाळण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील एका सहकारी साखर कारखान्यात मजूरी करीत होते.ते गेल्या वर्षी सेवा निवृत्ती झाले.त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या दोन मुली व मुलगा यांचा विवाह करून त्यांच्या कर्तव्यातून उतराई होत असतांनाच,त्यांची १० वी शिकलेली शेवटची व धाकटी मुलगी रुपाली (वय वर्षे २५) हिच्या विवाहाचे स्वप्न बघत असतांना च रुपालिला जर्जर आजार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. 

लहान असतांना झालेला आजार आज उद्भवला.याविषयी  वडिलांनी माध्यमांना माहिती दिली की, वयाच्या सहाव्या वर्षी रुपालीला हृदयाला बारीक छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्यावेळी तिला पुण्यातील नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यावेळी तेथील डॉक्टरांनी औषधचा कोर्स केल्यास पुढे काही त्रास होणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार रोज गोळ्या व औषध सुरू झाल्या. वयाच्या २५ वर्षांपर्यंत रुपालिला कोणताही त्रास झाला नाही. मात्र,अचानक गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिला थकवा, चक्कर व दम लागणे असे लक्षण दिसू लागले.त्यावर घरच्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवले.त्यांनी तिला मोठ्या दवाखान्यात हलविण्याचे कुटुंबातील लोकांना सांगितले.

  त्यानुसार रुपालिला मुंबई येथील दवाखान्यात दाखल केले. तपासणी नंतर रुपाली गंभीर आजाराने पीडित असल्याचे  डॉक्टरांनी सांगितले.शिवाय तात्काळ तिचे हृदय आणि फुफ्फुसे बदलावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.यासाठी मोठा खर्च लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आणि कुटुंबांवर मोठे संकट कोसळल्याचे अनुभूती झाली.यासाठी मोठी रक्कम जमविणे परस्थिती नुसार कठीण होते.

कारण,अल्पशेती असल्याने कुटुंब निर्वाहा साठी पत्करलेल्या मजुरीच्या जोरावर दोन मुली आणि मुलगा यांचे संगोपन, त्यांचे लग्न, रुपालीच्या औषध उपचारासाठी झगडनाऱ्या आई वडिलांचा जीवनसंघर्ष,त्यात उद्भवलेली दुष्काळी परस्थिती,वडील रामदास व आई सुशीला यांच्या साठी एक मोठे आवाहन बनली आहे.मुलीला रोज लागणारे औषध वेळेत न मिळाल्यास तिच्या जीवाची होणारी तगमग आई डीलांना मरण कळा देत आहे.पोटच्या पोरीचा जीव वाचवण्यासाठी वडील रामदास यांनी माणुसकीच्या दृष्टीने व मुलीच्या प्रेमापोटी सामान्य जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.

या आजारातून रुपालीला वाचवण्यासाठी तिचे हृदय व फुफ्फुसे बदलावे लागणार असून,त्यासाठी ३० लाख रुपये खर्च दवाखाना व्यवस्थापनाने सांगितले आहे.यासाठी आतापर्यंत जनतेने पन्नास ते साठ  हजार ईतकी रक्कम औटी कुटुंबाला बँक अकाउंट मध्ये मदत झाली आहे .व आजून जनतेने आजून सढळ हाताने माझ्या मुलीच्या उपचारासाठी मदत करावी.असे आवाहन मुलीच्या आई वडिलांनी केले आहे.


मोबाईल क्रमांक ९६५७४०१७७७ ,८८५५०१७६०४,८६००४१०५०५,9175194004,9011419465 यावर संपर्क करावा.किंवा acccount number : 2568101024246 ,IFSC CODE :CNRB0002568 या बँक खात्यात मदत निधी म्हणून जमा करावा अशी विनंती रुपलीच्या आई वडिलांनी केली आहे.


रुपाली च्या ऑपरेशन करण्यासाठी भरपूर खर्च येणार आहे.आणी त्यासाठी निधी गोळा करण्यासाठी नगरसेवक अंबादास औटी,मा.नगरसेवक दादासाहेब औटी,अनिल महाराज औटी,नितीन रोही प्रहाचे शहरध्यक्ष हे भरपूर परिश्रम घेत आहेत.


संभाजीराव भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी राखून औटी  कुटुंबास तीस हजारांची मदत केली आहे.आजूनसुद्धा निधी जमा होत आहे,रक्कम एव्हडी मोठी आहे की ती सहज जमा होणे शक्य नाही.ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या परीने रुपाली ताईसाठी मदत करावी असे आव्हान भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget