भारतात नवं सरकार आल्यावर अमेरिका 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय घेणार


भारतात नवं सरकार आल्यावर अमेरिका 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय घेणार

न्यूयॉर्क : अमेरिकेकडून भारतीय निर्यातदारांना देण्यात येणारी सूट (generalized system of preferences) पुढे चालू ठेवायची की नाही याचा निर्णय 23 मे नंतर म्हणजे नवं सरकार आल्यानंतर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने भारताचा जीएसपी दर्जा काढण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी दिला होता. पण यावर आता अंतिम निर्णय नवं सरकार आल्यानंतर होऊ शकतो. अमेरिका व्यापार प्रतिनिधी मंडळाने भारताचा जीएसपी दर्जा काढला होता, पण हा दर्जा पुढचे 60 दिवस कायम राहिल, असंही मार्चमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं.

60 दिवस संपत असले तरी नवं सरकार येईपर्यंत वाट पाहण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. त्यानंतर 23 मे रोजी निकाल लागणार आहे. भारतीय निर्यातदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जीएसपी दर्जा नव्या सरकारवर अवलंबून असेल, असं बोललं जातंय.

दरम्यान, जीएसपी दर्जा काढल्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे किरकोळ निर्यातदारांनी व्यापार चालू ठेवावा, असंही आवाहन भारत सरकारकडून करण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेतील 25 खासदारांच्या शिष्टमंडळाने भारताचा जीएसपी दर्जा काढू नये, अशीही विनंती व्यापार प्रतिनिधी बोर्डाकडे केली होती. यामुळे अमेरिकेतील कंपन्या, ज्या भारतात निर्यात वाढवू इच्छित आहेत त्यांना तोटा होईल, असं म्हटलं होतं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget