कौमार्य चाचणीला विरोध केल्याने कुटुंबावर बहिष्कार


ठाणे : एकीकडे पुरागोमी महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना दुसरीकडे कौमार्य चाचणीला विरोध केल्याने त्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. यातील धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथमधील विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने, त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला

भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७० वर्षांचा कालावधी उलटला असून, पुरोगामी महाराष्ट्र जातपंचायतीच्या अनिष्ट रुढीतून मुक्त झालेला नाही. त्यात गेल्या काही काळात कंजारभाट समाजाच्या कौमार्य चाचणीच्या प्रकारामुळे जात पंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या तरुणी आणि कुटुंबाला समाजाच्या बहिष्काराच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. अंबरनाथमध्येही कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या एका उच्चशिक्षित दाम्पत्याला जातपंचायतीच्या बहिष्काराला सामारे जावे लागले आहे

विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला होता, म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने दीड वर्षापासून त्यांना बहिष्कृत केले आहे. विवेक तमायचीकर यांच्या आजीचे निधन झालं. तमायचीकर यांच्या आजीच्या अंतयात्रेत कंजारभाट समाजातील एकही माणूस सहभागी झाला नाही.

त्यामुळेच जात पंचायतीने तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला. तमायचीकर यांच्या आजीचे निधन झाले त्याचवेळी याच समाजातील एक लग्नाचा हळदी समारंभ सुरु होता. लग्न-हळद हे पूर्वनियोजित असतात हे मान्य आहे, पण या हळदी समारंभात डीजे लावून जल्लोष सुरु होता. एखाद्या माणसाचं निधन झाल्यानंतर परिसरात दुखवटा पाळला जातो. मात्र तमायचीकर यांच्या आजीचं निधन झालं असूनही डीजेचा दणदणाट सुरुच होता, शिवाय त्यांच्या अंत्ययात्रेतही कोणी आलं नाही. गावातील पुढाऱ्याने या अंत्ययात्रेस जाण्यास नागरिकांना मज्जाव केला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget