पुण्यात भूत बंगल्यांच्या नावाखाली अवैध धंद्यांचा सुळसुळाट


पुणे : भूत बंगले आणि भूतांच्या वाड्यांच्या आतापर्यंत आपण अनेक सुरस कथा ऐकल्या असतील. मात्र पुण्यातील तीन तरुणांनी याचं वास्तव शोधण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी एक धक्कादायक वास्तव समोर आलं. भूताच्या नावाखाली या बंगल्यात अवैध व्यवसाय आणि व्यसनांचा सुळसुळाट झालाय. अंमली पदार्थ आणि लैंगिक औषध सेवन करणाऱ्यांचा हे बंगले अड्डे बनलेत. या मानवी नशेली भूतांचा रात्रीस खेळ चालतोय, तो ही उच्चभ्रू आणि संवेदनशील भागात.

भूत बंगला म्हणून ओळखली जाणारी वास्तू… गेल्या अनेक वर्षांपासून भग्न आणि निर्मनुष्य आहे. या वास्तूत भूत असल्याचं सांगितल्याने इकडे कोणी फिरकत नाही. याचाच फायदा नशेबाजांनी घेतलाय. त्यामुळे हे भूत बंगले आता अवैध व्यसनांचे अड्डे बनलेत.

पुण्यातील तीन तरुणांनी या भूत बंगल्यांचं वास्तव शोधण्यास सुरुवात केली. संकल्प माळवे, गौतम देबनाथ, तहा राजकोटवाला यांनी यासाठी पुढाकार घेतला. तिघांनी युनिक पुणे नावाची वेब सीरिज सुरु केली. आतापर्यंत या तिघांनी चार बंगल्याची शहानिशा केली. तळजाईचा ठुबे बंगला, द मॅशन बंगला, इस्कॉन टेम्पल जवळील बंगला आणि खडकीचा ब्रिटीश कालीन बंगल्याचं वास्तव शोधलं. यावेळी त्यांना धक्कादायक चित्र पाहायला मिळालं.

अंमली पदार्थ आणि लैंगिक भावना उत्तेजित करणाऱ्या औषधांचा इथे खच आढळून आलाय. पुण्यातील अतीउच्चभ्रू आणि प्रतिष्ठित भागात हा भूत बंगला आहे. द मॅशन नावाने हा भूत बंगला ओळखला जातो. बंगल्याच्या भिंतीला लागून रेसिडेन्सी क्लब आहे. इथे उच्चभ्रूची नेहमीच वर्दळ असते. तर हाकेच्या अंतरावर गेस्ट हाऊस आणि काही अंतरावर विधानभवन आहे. अशा हायप्रोफाईल भागात भूताच्या नावाखाली अवैध व्यसनांचा सुळसुळाट झालाय.

पुण्यात अनेक मोक्याच्या ठिकाणी असे भूत बंगले आहेत. आपला हेतू साधण्यासाठी जाणीवपूर्वक या बंगल्यांबाबत भूतांची आवई उठवली जाते. त्यामुळे पुरातन निर्जन आणि निर्मनुष्य बंगले ओसाड पडलेत. मात्र अवैध व्यवसाय आणि व्यसनिधनांनी हीच संधी साधली आहे. या बंगल्याचा वापर गैरकृत्यसाठी केला जातोय.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget