आ.थोरातांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शेततळ्यांमधून दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा

संगमनेर (प्रतिनिधीकाँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा.महसूल व कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात राज्यात लाख शेततळी निर्माण करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा राज्यभरात अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहेसंगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या सुमारे तीन हजार शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात मोठा दिलासा मिळत आहे
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विविध मंत्रीपदांचा काळात राज्यभर आपल्या कर्तृत्वातून कामाचा ठसा उमटविलामहसूलमंत्री पदाच्या काळात या खात्याला लोकाभिमूख करतांना ऑनलाईन सातबारा सह सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विविध नवनवीन उपक्रम राबविलेपाटबंधारे मंत्रीपदाच्या काळात निळवंडे धरण मार्गी लावलेतर शिक्षणमंत्री म्हणून शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिलासलग सहा वर्षे कृषीमंत्री असतांना रायात 1 लाख शेततळी निर्माण करण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतलायाचा लाभ घेत रायात मोठया संख्येने शेततळयांची निर्मिती झाली.यातून खऱ्या अर्थाने जलक्रांती होवून पाण्याचे व ठिबक सिंचनाचे महत्व वाढीस लागले.
संगमनेर तालुक्यात ही शेततळ्याांची ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबविली गेलीशेततळ्याामुळे दुष्काळी जनतेला शेततळ्याांच्या माध्यमांतून मोठा पर्याय उपलब्ध झाला.पावसाळ्यात शेततळ्यांमध्ये पाणी साठवून उन्हाळ्यात तेच पाणी काटकासरीने वापरने हा कष्टचा उपक्रम संपूर्ण रायासह संगमनेर तालुक्यात सुरु झालासंगमनेर तालुक्याच्या अवर्षण प्रवण गावांत सुमारे 3000 शेततळे व ठिबक सिचंनाच्या माध्यमातुन 7200 हेक्टर  क्षेत्रावर  डाळीबांचे पीक आहेया शेततळ्यांच्या माध्यमातुन फळबागांसाठी दिड हजार कोटी लिटर सुरक्षित पाण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
    शेततळ्यांच्या पाण्याच्या माध्यमातून डाळींबाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात असून डाळींबाच्या पीकाने दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळवून दिले आहेदुष्काळी तळेगांव भागात मोठ्या प्रमाणावर डाळींबाची लागवड झाली आहे.यापूर्वी वडगांव लांडगा,जवळे कडलग व आढळा खोर्यात असणारे डाळींब हे पीक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे.हे सर्व शेततळ्यांच्या माध्यमांतून शक्य झाले आहे.पावसाळ्याात पडणारा सर्व साधारन 200 मि.मी पाऊस शेततळ्यांत साठविला जातो त्याचप्रमाणे 15 - 20 कि.मी अंतरावरून टँकरद्वारे पाणी वाहतूक करून शेततळ्यांमध्ये साठविले जाते.
     माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून शेततळ्याांमधून तालुक्यात मोठी कृषी क्रांती झाली असून शेतकरी पाणी बचत व पाण्याचा काटकसरी वापर करत दुष्काळातही एक नवा आदर्श रायापुढे उभा करत आहेत.म्हणून सगळीकडे शेततळ्याांचा संगमनेर पॅटर्न नावारूपास आला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget