मराठा आरक्षणप्रश्‍नी वैद्यकीय प्रवेशाची माहिती सादर करण्याचे निर्देश


नवीदिल्लीः पदव्युत्तर वैद्यकीयचे आतापर्यंत किती प्रवेश झाले आहेत, याची सविस्तर आकडेवारी सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाप्रकरणी राज्य सरकारला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्थगिती दिलेली नाही.

वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला ‘एसईबीसी’ प्रवर्गातर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवून प्रवेश प्रक्रिया ठरल्याप्रमाणे सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर बुधारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पदव्युत्तर वैद्यकीयचे आतापर्यंत किती प्रवेश झाले आहेत, याची सविस्तर आकडेवारी सादर करा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरूवारी होणार आहे.
दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण (एसईबीसी) पूर्वलक्षीप्रभावाने लागू करण्यावर आक्षेप घेणार्‍या डॉ. आदिती गुप्ता, डॉ. अनुज लद्दड, डॉ. रसिका सराफ यांच्यासह इतर उमेदवारांनी नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. यावर निर्णय देताना नागपूर खंडपीठाने यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. उच्च न्यायालयाने या अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत राबवण्यात आलेली प्रवेश प्रक्रियाही अवैध ठरवीत त्यानुसार झालेले सर्व प्रवेश रद्द केले. अखेर या प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget