सह्याद्री मल्टिसिटी निधी लि." कडून वर्धापन दिनानिमित्त "आयडॉल लेडी" पुरस्काराचे आयोजन


प्रतिनिधी- सह्याद्री मल्टिसिटी निधी लि. या आर्थिक संस्थेला येत्या ९ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील १०० कर्तृत्ववान महिलांना आयडॉल लेडी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सह्याद्री मल्टिसिटी निधी लि चे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य निधी डेव्हलमपेंट असोशिएशन चे अध्यक्ष श्री. संदीप थोरात यांनी केले आहे.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या "आयडॉल लेडी " पुरस्कार सोहळ्याच्या पुरस्कार वितरणासाठी शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवस्मारक समिती, मुंबईचे अध्यक्ष आ. विनायकराव मेटे, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री दिपालीताई सय्यद-भोसले, नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप, खासदार दिलीप गांधी, मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती गणेश गीते, राष्ट्रसंत डॉ. ज्ञानेशानंद शास्त्री महाराज, चैत्यन्य उद्योग समूह, राहुरीचे अध्यक्ष गणेश भांड, राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, भारत सरकारचे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक राजदूत डॉ. सुनील गंधे, व्यंकटेश मल्टीस्टेट चे चेअरमन अभिनाथ शिंदे, नगर तालुका ग्राम सुधार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव थोरात, साई आदर्श मल्टीस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे, नगर तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष उद्धवराव अमृते, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के, दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के, आधारवेल फाउंडेशनच्या अध्यक्ष्या व जिल्हा नियोजन समिती सदस्य वैशालीताई नान्नोर, जिल्हा बँकेचे संचालक व दत्तकृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्ता पानसरे, काळभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष बलभिमराव कराळे,रांजणीचे सरपंच बाळासाहेब चेमटे आदी उपस्थित राहणार आहेत.


सह्याद्री मल्टिसिटी निधी लि हि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या अधिपत्याखाली काम करणारी संस्था आहे. एका वर्षांमध्ये संस्थेने जिल्ह्यामध्ये आर्थिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना अतिशय विनम्र, तत्पर तसेच ग्राहकाभिमुख सेवा देत आहे. संस्थेकडे ठेवीदार, कर्जदार, तसेच सभासदांच्या संख्येमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील १०० महिलांना पुरस्कार देण्याचा मानस आहे. संस्थेच्या यशामध्ये जास्तीत जास्त वाट हा महिलांचा आहे. महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने संस्थेने यावर्षीपासून प्रत्येक वर्धापन दिनाला जिल्ह्यातील १०० महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे.

आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची आणि शाब्बासकीची थाप पडणे गरजेचे आहे. पुरस्कारामुळे महिलांचा काम करण्याचा उत्साह वाढावा, त्यांच्या कामाची गती वाढावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे हा पुरस्कार देण्यापाठीमागचा प्रामाणिक हेतू आहे. ब्युटिशियन, वकील, डॉक्टर, ग्रामसेवक, तलाठी, समाजसेवक, उद्योजक, पोलीस, शिक्षक, सरपंच, शेतकरी, कीर्तनकार, गायिका त्याचबरोबर इतर विविध क्षेत्रातील १०० महिलांना आयडॉल लेडी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेचे सभासद, खातेदार, कर्जदार, ठेवीदार, पिग्मी एजंट सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सह्याद्री उद्योग समूहाच्या संचालिका सौ. शुभांगी थोरात यांनी केले आहे.Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget