दुभाजक ओलांडत कारची विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीन दुचाकींना धडक; पाच ठार



पुणे : पुणे-नाशिक रस्त्यावर चाकण परिसरात भरधाव वेगात कारने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीन दुचाकींना मंगळवारी रात्री धडक दिली. यात पाच जण जागीच ठार झाले.

चंद्रशेखर सूरजलाला विश्वकर्मा (३८), सुनील परमानंद शर्मा (४३, दोघे रा. भोसरी), दीपनारायण हरिवंश विश्वकर्मा (२४), सत्यवान पांडे (४५) व सर्वज्ञ संजय विश्वकर्मा (३५, तिघे रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे असून ते मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी अाहेत. चाकण पोलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सुहास नामदेव शिवकरी (रा. नवलाखउब्रे, ता. मावळ, जि. पुणे) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुहास शिवकरी हा त्याच्या एर्टिगा गाडीने एचपी चौक ते शिंदे वासुली चौकाकडे जात असताना त्याने भरधाव कार चालवून दुभाजक ओलांडत तीन दुचाकींना जाेरदार धडक दिली. यात दुचाकींवरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर शिवकरी याची कारदेखील उलटली. यात ताेदेखील जखमी झाला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget