मोदी, शहांविरुद्धच्या तक्रारी, ६ मेपर्यंत निर्णय घेण्यात यावा - सुप्रीम कोर्ट



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील नऊ तक्रारींबाबत ६ मेपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. काँग्रेसने भाजपच्या या दोन दिग्गज नेत्यांविरोधात आचारसंहिता उल्लंघनाच्या ११ तक्रारी केल्या होत्या, त्यापैकी दोन तक्रारींवर आयोगाने निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ६ मे रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना म्हटले होते की, भाजपचे हे दोन्ही नेते द्वेषयुक्त वक्तव्य करताहेत आणि लष्कराच्या नावावर मते मागताहेत. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोग काहीच कारवाई करत नाही. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने आयोगाकडून याबाबत उत्तर मागवले होते. गुरुवारी आयोगाने सांगितले की, ११ मेपासून दोन तक्रारींवर निर्णय घेऊ. त्यांनी पंतप्रधानांना क्लीन चिट दिली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget