प्राचार्य डॉ.आर.के.दातीर यांनी सह्याद्री महाविद्यालयाचा लौकिक वाढविला - आ.डॉ.सुधीर तांबेसंगमनेर ( प्रतिनिधी ) -  प्राचार्य डॉ.रामहारी दातीर यांनी त्यांच्या कार्यकाळात सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन केले. महाविद्यालयाला एक उत्कृष्ट नेतृत्व दिले.आपल्या कार्यकर्तुत्वाने त्यांनी महाविद्यालयाला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे सहयाद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्था फक्त समाधानीच नाही तर संस्थेला व व्यवस्थापन मंडळाला त्यांचा सार्थ अभिमान असून दातीर यांनी सह्याद्री महाविद्यालयाचा लौकिक वाढविला असल्याचे गौरवोदगार संस्थेचे चेअरमन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी काढले आहे.
स.म.भा.सं.थोरात महाविद्यालयातील के.बी.दादा सभागृहात संस्था आणि महाविद्यालयातील सेवकांनी आयोजित केलेल्या डॉ.दातीर यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ सोहळ्याात ते बोलत होते. यावेळी समवेत व्यासपीठावर चंद्रकांत पाटील कडलग, लक्ष्मणरावजी कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, शिवाजीराव थोरात, तुळशीनाथ भोर, सिताराम वर्पे, दत्तात्रय पाटील, थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर , प्राचार्य कानवडे, पानसरे, बाळसाहेब उंबरकर, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे, बाळासाहेब खर्डे,कुंडलिक सहाणे, प्राचार्य शिंदे, उपप्राचार्य उगले, डॉ.दातीर यांच्या मातोश्री गं.भा.राधाबाई दातीर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.डॉ.तांबे म्हणाले की, प्राचार्य डॉ.दातीर यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत महाविद्यालयात एक शिस्तप्रिय प्राचार्य म्हणून आपली ओळख निर्माण केली. महाविद्यालयाला आर्थिक शिस्त लावली.सेवक व विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त शिस्त निर्माण करुन ते एक शिक्षकप्रिय व विद्यार्थीप्रिय प्राचार्य बनले. साधारणत: सेवापूर्ती कार्यक्रमात निवृत्त होणार्‍या सेवकाबाबत सर्वजण चांगले बोलतात परंतु प्राचार्य डॉ.दातीर त्याला अपवाद आहेत. मुळातच त्यांचे कामकाज खुप चांगले, शिस्तबध्द, पारदर्शक आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेणारे असे होते. व्यवस्थापनाशी त्यांचे संबंधचांगलेहोते.
संस्थेचे माजी चेअरमन लहानुभाऊ गुंजाळ  म्हणाले की, स्व.भाऊसाहेब थोरातांनी मोठया कष्टाने हे महाविद्यालय सुरु केले. त्यांचा आदर्श पुढे ठेवून प्राचार्य डॉ.दातीर यांनी चांगले कामकाज केले.त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांच्या कामकाजाबाबत एक देखील तक्रार संस्थेकडे अथवा संस्थेच्या कार्यकारी मंडळाकडे आली नाही यात त्यांच्या उत्कृष्ट कामकाजाचे रस्य सामावलेले आहे. 
संस्थेचे सचिव चंद्रकांत पा. कडलग यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, प्राचार्य डॉ.दातीर यांची कामकाज करण्याची पध्दती खूप चांगलीहोती. महाविद्यालयाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी त्यांनी खूप वेळदिला आणि मेहनत देखीलघेतले.महत्वाचे निर्णय घेताना संस्थेला विश्‍वासात घेऊन कामकाज केले.
संस्थेचे रजिस्ट्रार आचार्य बाबुराव गवांदे म्हणाले की, शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता ही प्राचार्य डॉ.दातीर सरांच्या कामकाजाची त्रिसुत्री होती.त्यांनी वि-ाान शाखेच्या अद्ययावत प्रयोगशाळा वविविध विभाग त्यांनी उभारले. संगणक लॅब देखील उभारली.महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव, संस्थेचा सुवर्ण महोत्सव आणि वि-ाान भवन इमारतीचे उदघाटन इ. कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी केले.
सेवापूर्ती सत्कार सोहळयाला उत्तर देताना प्राचार्य डॉ.दातीर म्हणाले की, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात , आमदार डॉ.सुधीर तांबे व संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी माझेवर विश्‍वास टाकून प्राचार्य पदाची मला संधी दिली. इतर शैक्षणिक संस्थापेक्षा स.ब.वि.प्र. समाज संस्थेचा माझा अनुभव खुप चांगला आहे. येथील संस्थाचालक राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून शैक्षणिक संस्थांचे कामकाज करतात. प्राचार्य, प्राध्यापक यांना सन्मानाची वागणूक देतात. संगमनेर शहरात माझे शिक्षण झाले परंतु 35 वर्षे परजिल्हयात/नाशिक जिल्हयात नोकरी केली परंतु संस्थेने संधी दिल्याने मला मायभूमीच्या ऋणातून उतराई होण्याची संधी मिळाली. संस्थेचे व संस्थाचालकांनी मला सेवक म्हणून नव्हे तर  कुटुंबातील एकघटक म्हणून सन्मानाची वागणूक दिली. आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ.सुधीर तांबे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच माझी कारकिर्द फुलली. संस्थेचे सचिव चंद्रकांत पाटील कडलग, सहसचिव तुळशीनाथ भोर, खजिनदार लक्ष्मणरावजी कुटे, रजिस्ट्रार बाबुरावगवांदे तसेच महाविद्यालयातील सर्वसेवकांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले त्याबददल त्यांचे आभार.
यावेळी जगन्नाथ घुगरकर, राजूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ठकाजी कानवडे, प्राचार्य डॉ.दातीर यांच्या अर्धांगिनीसौ.सविता दातीर, चिरंजीव सत्यजित दातीर, कन्या शिवांजली दातीर, प्रा.कासव, महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.शिवाजी नवले, महाविद्यालय विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.प्रमोदिनी कदम, प्रा.घायवट, नाशिकजिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक दत्तात्रय पाटील इ.नी. मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.घायवट व प्रा.स्नेहलता थिटमे यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा.गोरक्षनाथ थोरात यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget