संगमनेर नगरपालिका कोणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे - ॲड संग्राम जोंधळे

 Image result for संगमनेर नगरपालिका
 
संगमनेर -प्रवरा नदीला नुकतेच उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यात आलेले आहे.  उन्हाळ्याची सुट्टी असल्याने अनेक युवक-युवती नदीला पोहण्यासाठी जाणे स्वाभाविक आहे. तो त्यांचा नैसर्गिक हक्क व अधिकार आहे.  अनेक संगमनेरला आलेली  पाहुणेमंडळी पोहण्याचा आनंद घेत असतात. परंतु  दरवर्षी या आनंदाला गालबोट लागत असते.कोणाचा तरी पोहण्याच्या नादात बळी जात असतो.   
 
 याचे प्रामुख्याने कारण म्हणजे प्रचंड वाळू उपशामुळे जागोजागी झालेले खड्डे , वाळू  तस्कारांना  कोणाचीही भीती राहिलेली नाही. किंवा कोणाचा  तरी पाठिंबा  असल्यामुळे हा प्रकार नियमित घडत आहे.  यावर अंकुश ठेवायला कोणीही तयार नाही. नदीपात्रामध्ये दगड धोंडे उघडे पडलेले आहेत. वाळु उपशा मुळे अनैसर्गिक कपारी निर्माण झाल्या आहेत. तसेच दारूच्या बाटल्या , काचा,खिळे  लोखंडे व इतर वस्तू यामुळे  नागरिकांच्या जीविताला धोका व  इजा होत असतात.
 
 संगमनेर नगरपालिकेत विरोधी पक्ष केवळ नाम  मात्र आहे.  सत्ताधारी   नगरसेवकांना  कोणतेच अधिकार असल्याचे दिसत नाही. ते लग्नपत्रिकेत नावापुरतेच दिसतात.  नागरिकांच्या समस्यांकडे धावण्यासाठी त्यांना वेळ नाही. संघर्ष सामाजिक संघटनेने गेल्या वर्षी उन्हाळ्यात निवेदन देऊन काही उपाययोजना  सुचवलेल्या होत्या. त्या मध्ये गंगामाई  पासून नदीच्या पुलापर्यंत वाळू उपसा करण्यास प्रतिबंध करावा.  वाळुचे खड्डे पाण्याचे आवर्तन  नसतांना बुजविण्यात यावेत,  कपारी बुजविण्यात याव्यात.नदीमधील दगड, धोंडे, काचा गोळा करण्यात यावे. 
 या कामात संघर्ष संघटना देखील भाग  घेण्यास तयार असल्याचे कळविले होते. याशिवाय  नदीपात्रात प्रमुख ठिकाणी आडवे दोर बांधण्यात यावे. किमान दोन लाईफ गार्डस ची नेमणूक करावी, अशी सूचना केल्या होत्या. परंतु संगमनेर  नगरपालिकेला नागरिकांकडून आलेल्या सूचनांना केराची टोपली दाखविणे  पसंत असल्याने  संगमनेर  नगरपालिकेने आजतागायत या गोष्टींची दखल घेतली नाही. त्यामुळे 'नेमिचे येतो पावसाळा' या म्हणीप्रमाणे 'नेमिचे येते उन्हाळ्याचे आवर्तन व जातो बळी ' त्यामुळे त्यात काय विशेष, अशी नगरपालिकेची भूमिका आहे. ही संगमनेकरांसाठी दुर्दैवाची बाब आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget