मोदी 'डिव्हायडर इन चीफ', 'टाईम' मासिकाच्या कव्हरपेजची जगभर चर्चा


मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगप्रसिद्ध अमेरिकन मासिक ‘टाईम’ने ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ असे संबोधले आहे. ‘टाईम’ मासिकाच्या नव्या आवृत्तीच्या कव्हरपेजवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र छापण्यात आले असून, ‘ इंडियाज डिव्हायर इन चीफ’ असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. या कव्हरपेजवरुन आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या 20 मे रोजी ‘टाईम’चा नवीन अंक बाजारात येणार आहे. सध्या सोशल मीडिया आणि वेबसाईटवरुन ‘टाईम’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातील स्पेशल रिपोर्ट पोस्ट केला आहे.

‘टाईम’ मासिकाच्या आशियातील आवृत्तीच्या चालू अंकात भारतातील लोकसभा निवडणुकीवर मुख्य बातमी करण्यात आली आहे. याच अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाच वर्षातील सत्ताकाळाचा आढावाही घेण्यात आला आहे. ‘Can the World’s Largest Democracy Endure Another Five Years of a Modi Government?’ अशा मथळ्याखाली ‘टाईम’मध्ये विशेष रिपोर्ट छापण्यात आला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येणं म्हणजेच भारताबद्दल आतापर्यंत ज्या उदारमतवादी संस्कृतीची जगभर चर्चा होत असे, त्या भारतात खरंतर धार्मिक राष्ट्रवाद, मुस्लिमांविरोधातील तीव्र भावना आणि जातीय कट्टरताच मुरली आहे.” असे ‘टाईम’ मासिकाने मुख्य लेखात म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget