निवडणूकीच्या ड्युटीवर असताना जवानाची आत्महत्या



बिहार : निवडणूक ड्युटीवर असलेल्या सीमा सुरक्षा बल (एसएसबी) जवानाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना हाजीपूर येथे घडली आहे. 


ईश्वर गिरीधर चौधरी असे जवानाचे नाव असून, त्यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी मारत आत्महत्या केली. चौधरी हे मूळचे जळगाव (महाराष्ट्र) येथील रहिवाशी आहेत. चौधरींच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही.

ईश्वर गिरीधर चौधरी हे एसएसबी 65 बटालियनमध्ये तैनात होते. बिहारमधील हाजीपूर जिल्ह्यात एसएसबीचं पथक थांबलं आहे. 

आज हाजीपूर येथे मतदान असल्याने, तिथे रवाना होण्याआधी ईश्वर गिरीधर चौधरी यांनी बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget