अखेर मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

Image result for मसूद अजहर

न्यूयॉर्क : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवलाय. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने याअगोदरच या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला होता. पण चीनने तांत्रिक कारण दाखवत आडकाठी केली होती.

Big,small, all join together असं म्हणत भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याची माहिती दिली. चीनने कालच चर्चेतून मार्ग काढण्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भारताच्या बाजूने भूमिका घेत यूएनएससीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील संघटना जैश ए मोहम्मदने घेतली. यानंतर फ्रान्सने पुढाकार घेत मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव आणला. या प्रस्तावाला यूएनएससीचे चार स्थायी सदस्य फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा पाठिंबा होता. पण पाचवा स्थायी सदस्य असलेल्या चीनने तांत्रिक कारण दाखवलं होतं. चीननेही आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत अखेर या प्रस्तावाला पाठिंबा दिला.Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget