बाबासाहेब पुरंदरेंना 'पद्मविभूषण' हा महाराष्ट्राचा अपमान : संभाजी ब्रिगेड

Image result for बाबासाहेब पुरंदरे

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पद्मविभूषण पुरस्कारावरुनही आता वादाला सुरुवात झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज बाबासाहेब पुरंदरे यांना देशाचा दुसरा सर्वात मोठा पुरस्कार ‘पद्मविभूषण’ घरी जाऊन प्रदान केला. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने त्याला आक्षेप घेतला आहे.

“बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण देणे हा महाराष्ट्राचा अपमान, हे चुकीचा इतिहास लिहिण्याबद्दल’चे पद्मविभूषण आहे”, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली. महाराष्ट्रातला शिवद्रोही पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिलं गेलं पाहिजे, आज काळा दिवस आहे, असाही घणाघात त्यांनी केला.

पुरंदरे यांना आरएसएसकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाद्वारे बदनाम करण्याची सुपारी दिली गेली. सुपारी घेणाऱ्या पुरंदरे यांना ‘पद्मविभूषण’ देणे हा तमाम शिवप्रेमींचा अपमान आहे. हा पुरस्कार बदनामी करण्याचे सरकारचे अधिकृत सर्टिफिकेट आहे. हे विकृत आणि खोटा इतिहास लिहिण्याबद्दलचे पद्मविभूषण आहे, असं संतोष शिंदे म्हणाले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget