रमजानमुळे मतदान पहाटे ५ पासून सुरू करण्याची मागणी

मुंबई :- मुस्लिमांचा रमझान सण ऐन निवडणुकीत सुरू होणार असल्याने या दरम्यान होणार्‍या तीन टप्प्यांच्या मतदानाची वेळ आणखी दोन तास लवकर घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 


याबाबत सर्वोच्च न्यायलयात अर्ज केला असून मतदानाची वेळ सकाळी 7 ते 5 याऐवजी पहाटे 5 पासून करता येईल का अशी विचारणा सर्वोच्च न्यायायलाने निवडणूक आयोगाला केली आहे. दरम्यान ५ मेला रमझान सुरु होत आहे.

रमझानला मुस्लिम बांधव पहाटे लवकर उठून जेवतात. त्यानंतर ते सकाळची प्रार्थना करून झोपी जातात. रणरणत्या उन्हामुळे ते दिवसभर बाहेर पडत नाहीत. 

ही गोष्ट विचारात घेऊन सात मे १२ मे आणि १९मेला निवडणूक आयोगाने मतदान पहाटे पाचला सुरु करण्यात यावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने यासाठी योग्या पाऊल उचलावीत असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसंच मध्य भारतात उष्माघातामुळे लोकांना बाहेर पडायला त्रास होतो. 

तेव्हा त्यांचा विचार करूनही पहाटे पाचला मतदान सुरू करावे असंही याचिकाकर्त्यांचे म्हणणं आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास भारतात पहिल्यांदाच १२ तास मतदानाची वेळ ठेवण्यात येणार आहे. ५ मे पासून रमझान सुरू होत असून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget