मोदींनी ही लढाई द्वेषाने लढली तर आम्ही प्रेमाने लढा दिला : राहुल गांधी


नवी दिल्ली : ही निवडणूक बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न, नोटाबंदी, जीएसटी आणि भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर निवडणूक लढवली. या निवडणुकीत चांगली लढाई झाली. मोदींनी ही लढाई द्वेषाने लढली तर आम्ही प्रेमाने लढा दिला. आता प्रेमाचाच विजय होईल असा मला विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. नवी दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत मतदान केल्यानंतर राहुल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राहुल गांधी म्हणाले की, जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी संताप आणि व्देषाने ओतप्रोत भरलेले असून त्याच मनोभूमिकेतून ते आमच्यावर सतत टीका करत असतात. आम्ही त्यांच्या मत्सराचे उत्तर प्रेमानेच देत राहू, असेही राहुल गांधी म्हणाले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget