भरउन्हात डोक्यावर टोपलं, दुष्काळ दौऱ्यात पंकजा मुंडेंचं श्रमदानबीड : विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे सध्या दुष्काळ दौरे सुरु आहेत. दुष्काळ दौऱ्यानिमित्त चारा छावण्यांना भेट आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याबरोबरच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड तालुक्यातील तळेगाव येथे भर उन्हात श्रमदान केलं. संध्याकाळी हिंगणी बु येथे वॉटरकप स्पर्धेतील गावात जाऊन ग्रामस्थांसोबत श्रमदान केलं. ही दोन्ही गावे पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत उतरली आहेत. या दोन्ही ठिकाणी ग्रामस्थ एकजुटीने दुष्काळ निवारणासाठी श्रमदान करत आहेत. पंकजा मुंडेंनीही या कामाला हातभार लावला.

पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दुष्काळ दौरा करताना चारा छावणी भेट, शेतकऱ्यांशी संवाद, टंचाईग्रस्त गावांना भेट दिली. त्यांनी तांबा राजूरी, आवळवाडी, रायमोहा, खोकरमोहा, तळेगांव, आहेर वडगाव, मांजरसुंबा, चौसाळा या ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्यांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. छावणीवर आणि बांधावर जाऊन तेथील परिस्थितीची आणि छावण्यावर असलेल्या सुविधांची त्यांनी पाहणी केली. शिवाय झाडाखाली बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget