सनी देओलच्या गाडीला अपघात, सुदैवाने थोडक्यात बचावला!


चंदीगड : पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचा लोकसभा उमेदवार अभिनेता सनी देओलच्या गाडीला अपघात झाला.
प्रचारादरम्यान सनीच्या ताफ्यातील गाडीला एका कारने धडक दिल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र सनीच्या रेंज रोव्हरचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे.अपघातावेळी सनी स्वत: गाडीत होता. सुदैवाने या अपघातात कुणाला दुखापत झाली नाही. पंजाबमधील धारीवालजवळ ही घटना घडली.

सनी देओल प्रचार रॅलीसाठी रेंज रोव्हरने जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीचा टायर फुटला आणि गाडी थेट डिव्हायडरवर गेली. गाडीचा अचानक ब्रेक दाबल्यामुळे सनी देओलच्या गाडीला पाठीमागच्या गाडीनेही धडक दिली. त्यामुळे त्या गाडीचंही नुकसान झालं आहे.अभिनेता सनी देओलने काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही तासातच सनी देओलला पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीही घोषित करण्यात आली. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना हे गुरुदासपूरमधून भाजपचे खासदार होते.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget