पॉर्न व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर बलात्कार



ठाणे : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलावर पॉर्न व्हिडीओ दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलाचे वय 9 वर्ष आहे. 


आरोपीचे नाव दिनेश लावहरी असे असून मानपाडा पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. 

डोंबिवलीमधील या 9 वर्षाच्या मुलाला आरोपी आपल्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडित मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने काही दिवसांनी पुन्हा पीडित मुलाला घरी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाने नकार दिला. 

याच्या राग मनात धरुन आरोपीने पीडित मुलाला मारहाण केली. आपल्या मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुलाच्या पालकांनी दिनेश काकाने का मारले, अशी विचारणा केली. 

तेव्हा मुलाने आईला त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली. हे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर, पीडित मुलाच्या पालकांनी मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. यासंबंधी कारवाई करत मानपाडा पोलिसांनी दिनेश लावहरी याला अटक केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget