अशोक चव्हाणांचा पक्ष संपवून काँग्रेसकडून आदर्श प्रकरणाचा बदला : नितेश राणे

Image result for नितेश राणे
 
कोल्हापूर : पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरुन काँग्रेस काही आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. याच संदर्भात बोलताना काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी कोल्हापुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.

 चव्हाण यांना आदर्श प्रकरणावरुन काढलं होतं. त्यामुळे ते महाराष्ट्रात काँग्रेस संपवून बदला घेत असतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर चांगलं काम करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची वेळ काँग्रेसवर आली असेल तर त्यांनी आत्मचिंतन करावं, असं देखील नितेश राणे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पाच आमदारांचा समावेश आहे.

आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर 10 मे रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget