पृथ्वीराज चव्हाण म्हणतात भाजपचे सरकार येणे अशक्य


मुंबई :- लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत व केंद्रात भाजपचे सरकारही येणार नाही, अशी भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवली आहे. 

देशभरातील जनतेची मानसिकता बघता जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत (यात महाराष्ट्र नाही) हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपच्या 2014 च्या तुलनेने शंभर जागा कमी होतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

भाजपचा पराभव होईल असे आपण कोणत्या आधारावर सांगता, असे विचारता चव्हाण म्हणाले, चुकीची धोरणे व फसलेली आश्‍वासने या दोहोंचा फटका भाजपला बसणार आहे. शिवाय, राज्या- राज्यातील प्रादेशिक पक्ष मोठ्या प्रमाणावर एकत्रित आल्याने भाजपची कोंडी झाली आहे.

मोदी सरकारच्या चुकीच्या आयात- निर्यात धोरणाने उद्योग-व्यापाराचे मोठे नुकसान झाले. शेतकरी विरोधी धोरणाने शेतकरी संकटाच्या खाईत लोटला गेला. 

मोदी सरकारने ना रोजगार दिला, ना नवे उद्योेग उभारले, ना काळा पैसा बाहेरून आणला ना दहशतवाद संपवला. शेतकरी, युवा, कामगार, उद्योेजक, व्यापारी सर्व क्षेत्रात या सरकारविषयी रोश आहे.

ते म्हणाले, भाजपचे माजी मुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या काळात प्रज्ञाला उजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता सुनील जोशी याच्या हत्येवरून अटक झाली होती. जी बाई आपल्या शापाने शहीद हेमंत करकरे यांना मृत्यु आला, असे सांगते, तिच्यावर विश्‍वास कसा ठेवणार?

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget