कुठल्याही स्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही : संजय निरुपम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पश्चिम मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी जाहीर केली आहे.

“राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही. मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नाही. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही.” असे काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले.


“मुंबई काँग्रेसमध्ये आता वाद होणार नाही, अशी अपेक्षा आहे. कारण आधी ते आरोप करायचे माझ्यावर. आता त्यांनी कोणावर आरोप करण्याची वेळ येऊ देऊ नये. त्याची काळजी सध्याच्या नेतृत्वानं घेण्याची गरज आहे.” असे म्हणत संजय निरुपम यांनी काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget