ऑलराऊंडर क्रिकेटपटूने केली आईसह आत्महत्या


विरार : मुंबईजवळच्या विरारमध्ये एका स्थानिक क्रिकेटपटूने आईसह आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे मायलेकाने राहत्या घरी विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलं. विनोद प्रकाश चौगुले उर्फ दादू असं 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर संजीवनी प्रकाश चौगुले असं 42 वर्षीय आईचं नाव आहे.

हे दोघे नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत भाड्याने रहात होते. काल रात्री सव्वा आठच्या सुमारास या दोघांचे मृतदेह घरात आढळून आले. विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन, दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन, आत्महत्येच्या कारणांचा तापस सुरु केला आहे.

विनोद हा उत्तम क्रिकेटर होता. तो विरारच्या “साईबा” या क्रिकेट टीममधून खेळायाचा. तो या संघात अष्टपैलूची भूमिका बजावत होता. त्याने विविध स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिकं पटकावली होती. त्यामुळे त्याच्या जाण्याने विरारमध्ये हळहळ व्यक्त होतं आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget