खासदार पत्नीला एक वर्षे तुरूंगवासाची शिक्षा


मुंबई :- शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे यांना सत्र न्यायालयाने एक वर्षे तुरूंगवासाची शिक्ष सुनावली आहे.
 
शेवाळे यांना मुंबईच्या सत्र न्यायालयाने एक वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. २०१४मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी आणि पक्षाच्या १७ कार्यकर्त्यांना मंगळवारी सत्र न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावली.

२०१४मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान, शिवसेना आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या संघर्षामध्ये एक कॉन्स्टेबल जखमी झाले होते. 


तुर्भेमध्ये पैसै वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते.यात पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले. याप्रकरणी कामिनी यांच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget