दहावीत पैकीच्या पैकी गुण न मिळवल्याने मुलाचा पाय तोडला!


तिरुअनंतपुरम : सध्या देशात वार्षिक परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच CBSE आणि ICSE बोर्डाचे निकाल जाहीर झालेत. या निकालांमध्ये कुणी 100 पैकी 99 टक्के मिळवले, तर कुणी पैकीच्या पैकी गुण मिळवले. पैकीच्या पैकी गुण मिळवण्याच्या या स्पर्धेत काही मुलं मागेही पडली. अशातच एका माथेफिरु पित्याने परीक्षेत सर्व विषयात पैकीच्या पैकी गुण न मिळवल्याने मुलाच्या पायावर कुदळीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय तुटला आहे. केरळच्या किलिमनूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

केरळमध्ये सोमवारी SSLC बोर्डाचे म्हणजेच दहावीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये सर्व विषयात ‘ए-प्लस’ न मिळवल्याने या क्रूर पित्याने आपल्याच मुलाला कुदळीने मारहाण केली. निकाल जाहीर झाल्याच्या काहीच तासात ही घटना घडली. साबू असे या 43 वर्षीय क्रूर पित्याचे नाव आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget