माझं काम पाहिल्यानंतर ट्रोल करणारेच कौतुक करतील, ट्रोलर्सना रोहित पवारांचा टोला


बारामती : “अलीकडच्या काळात पेड ट्रोलर्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे मी विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्याचं जाहीर केल्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं. पण, असं असलं तरी मला राजकारणात सक्रिय व्हायचं आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडे लक्ष देऊन मी माझ्या चांगल्या कामात बाधा आणणार नाही”, असं शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच, जे आता मला ट्रोल करत आहेत, तेच पुढे माझं काम बघून कौतुक करतील, असा टोलाही रोहित पवार यांनी ट्रोलर्सला लगावलाय.

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छूक असल्याचं सांगत, वरिष्ठ सांगतील त्या ठिकाणाहून मी निवडणूक लढवेल असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे रोहित पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीची चांगलीच तयारी केल्याचं दिसतं आहे. बारामतीत आज ‘वॉटर कप’ स्पर्धेनिमित्त अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेने महाश्रमदान सोहळा आयोजित केला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी आपली विधानसभा निवडणुकीविषयीची भूमिका स्पष्ट केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget