... अखेर पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचे प्रदर्शन ठरले; 'ह्या' तारखेला होणार रिलीज


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट 24 मे ला प्रदर्शित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 5 एप्रिल 2019 ठरवण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन 11 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. 


मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचे आयोजन केलं होतं. त्यामुळे मतदानाच्या एक दिवस आधी राजकीय व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित कसा होऊ शकतो, असा प्रश्न काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारला होता. तसेच हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली होती.

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची ही मागणी मान्य करत, लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करावा असे आदेश दिग्दर्शकांना दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल 23 एप्रिलला जाहीर होणार आहेत. 

हे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिलला नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचे प्रोड्यूसर संदीप सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget