विवाहबाह्य संबंधातून महिलेचं नाक आणि गळा कापलाठाणे : विवाहबाह्य संबंधातून 27 वर्षीय विवाहित महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना विरारमध्ये घडली. प्रियकराने महिलेचा राहत्या घरातच धारदार हत्याराने गळा आणि नाक कापले. विरार पूर्व साईनाथ नगर येथे 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता हे हत्याकांड उघड झाले. अमोल गणपत औदारे (28) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सोसायटीतील CCTV च्या आधारे हत्याकांडाचा उलघडा करुन 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. हत्या केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या झालेली महिला पतीसोबत विरार पूर्वमधील साईनाथ नगर येथे भाड्याने राहात होती. ते येथे मागील 1 वर्षांपासून राहत होते. त्यांचा 7 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण त्यांना मूलबाळ झाले नव्हते. पत्नी बोरिवलीतील ज्वेलरी कंपनीमध्ये काम करत होती, तर पतीही एका खासगी कंपनीत काम करत होता. 27 एप्रिल रोजी पती कामानिमित्त मूळ गावी गेला होता आणि पत्नी एकटीच घरी होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी 8 च्या सुमारास या महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. स्थानिक रहिवासी महिलांनी दारही वाजवले, पण कोणीही दार उघडले नाही. तेव्हा नवरा बायकोचे भांडण असेल, असे समजून शेजारी महिलांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. रात्री महिलेचा पती घरी आल्यावर दार उघडून पाहिले, तर त्याला पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

याबाबत पतीच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन विरार पोलिसांनी तपास सुरु केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी डॉ. सागर वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम तपासासाठी रवाना केली. पोलिसांनी सोसायटीचे CCTV तपासले असता 27 एप्रिल रोजी एक तरुण टोपी घालून संबंधित महिलेच्या रुममध्ये आल्याचे दिसले. या तरुणाला महिलेच्या पतीने ओळखले आणि तो पत्नीसोबत काम करत होता असे सांगितले. तसेच पत्नी त्याला मामे भाऊ म्हणत होती, अशीही माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना त्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget