सनी दिघे 95 टक्के गुण मिळवून दहावीत प्रथम


संगमनेर प्रतिनिधी : भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जोर्वे येथील युवक राजेंद्र रावसाहेब दिघे यांचा मुलगा सनी दिघे यांने इयत्ता दहावी सीबीएससी परीक्षेत 95 टक्के गुण मिळवून पंजाब येथील सैनिकी शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

आर्मी स्कूल कपूरताला, पंजाब येथे सनी राजेंद्र दिघे याने सीबीएससी इयत्ता दहावी परिक्षेत 95.05 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. राजेंद्र दिघे हे जोर्वे येथील असून शेतकरी कुटुंबातील आहेत. मागील वर्षी केदारनाथ येथे अडकलेल्या संगमनेरच्या 40 भाविकांना त्यांनी अडचणीत मदत केली होती. कपूरताला सैनिकी स्कूलचा देशात गुणवत्तेमुळे लौकिक आहे. या शाळेतून त्याने दैदिप्यमान यश मिळवले आहे.
त्याच्या या यशाबद्दल मा. शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात , आ. डॉ. सुधीर तांबे , सौ. दुर्गाताई तांबे , इंद्रजीतभाऊ थोरात, रावसाहेब दिघे, अर्जुन दिघे, सर्जेराव दिघे, नामदेव कहांडळ यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget