50 कोटींसाठी जानकरांना ब्लॅकमेलिंग, माढ्याच्या अपक्ष उमेदवाराला अटक


बारामती : दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतोले यांची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत 50 कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना 15 कोटी रुपयांची रक्कम घेताना पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामतीत अटक केलीय. या प्रकरणी डॉ. इंद्रकुमार भिसे, सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या कारंडे, विकास अलदर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना ऊत आलाय.

ब्लॅकमेलिंग नेमकं कशामुळे केलं जात होतं याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पण रक्कम देण्यास तयार आहोत, असं सांगून पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. 15 कोटींची रक्कम मागण्यात आली होती. पण प्रत्यक्ष साडे चार लाख रुपये जमा केले आणि खाली कागदाचे बंडल भरले आणि सापळा रचला. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे अटक केलेले सर्व आरोपी याअगोदर रासपचेच कार्यकर्ते होते.

फिर्यादी बाळासाहेब रुपनवर यांच्या माहितीनुसार, “सचिन पडळकर याने जानकरांना फोन करुन एक कोटी रुपये मागितले. निवडणूक लढण्यासाठी पैसे हवे असल्याचं त्याने सांगितलं. शिवाय बदनामीची धमकीही दिली. आम्ही एवढे पैसे देऊ शकत नाही, असं जानकरांनी स्पष्ट केलं. पण फोनवरुन त्रास सुरुच होता. जानकरांनंतर दोडतोले यांना फोनवरुन त्रास सुरु करण्यात आला”.

“आरोपींनी दोडतोले यांच्याकडे मागणी केली की, तुमच्या महामंडळासाठी एक हजार कोटी रुपये आले आहेत, त्यातून 100 कोटी रुपये द्या. मग मला फोन आला आणि बारामतीला बैठकीसाठी बोलावलं. तुमचा निरोप जानकर साहेब आणि दोडतोले यांना कळवतो असं त्या बैठकीत सांगितलं. आरोपींनी 50 कोटींची मागणी केली होती. काही दिवसांनंतर पुन्हा फोनवरुन त्रास सुरु झाला आणि पुण्यात बैठकीला बोलावलं. 50 ऐवजी 30 कोटी रुपये द्या अशी मागणी केली आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. अगोदर 15 कोटी रुपये देण्याचं ठरलं होतं. सापळा रचण्यासाठी साडे चार कोटी रुपये जमा केले आणि खाली कागदी बंडल होते. पैसे देण्यासाठी बारामतीतील हॉटेलमध्ये भेट ठरली. पण सगळे पैसे मोजेपर्यंत जाऊ नका, असं आरोपींनी सांगितलं. तेवढ्यात पोलिसांनी सर्वांना अटक केली,” अशी माहिती बाळासाहेब रुपनवर यांनी दिली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget