छावणी चालकांसाठी खुशखबर ; अनुदानाच्या 47 कोटीस मंजुरी

Image result for छावणी

अहमदनगर / नगर सह्याद्री
दुष्काळी परिस्थितीत बळीराजाचे पशुधन जगविण्यासाठी शासन निर्देशानुसार जिल्ह्यात तब्बल ४९० चारा छावण्या सुरू आहेत. या चारा छावणीची बिले मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या छावणी चालकांसाठी दिलासादायक वृत्त आहे. दि.२७ फेब्रुवारी ते १५ एप्रिल दरम्यानच्या कालावधीसाठी जिल्हा प्रशासनाकडून छावण्यांच्या अनुदानासाठी ४६ कोटी ८१ रुपयांचा निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यास ४ मे रोजी मंजुरी देण्यात आली असून, ५ मे रोजी हा निधी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. आता चारा छावण्याची बिले लेखापरीक्षकांच्या मार्फत तपासून बिलाची रक्कम छावणी चालक संस्थेच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget