विमानाला लागलेल्या भीषण आगीत 41 प्रवाशांचा मृत्यूरशियाची राजधानी मॉस्कोमध्ये विमानतळावर एका विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. रशियातील मीडिया रिपोर्ट्सनुसार विमानाच्या लॅंडिंग दरम्यान अचानक आग लागली. न्यूज एजन्सी टीएएसएसच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. 


तर ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत विमानाला लागलेल्या आगीचं लोळ आणि धुर दिसत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॅंडिंगनंतर लगेचच बचाव कार्य राबवण्यात आलं. विमानात एकूण ७८ लोकं प्रवास करत होते.

आग इतकी भडकली की, आतील प्रवाशांची राखरांगोळी झाली. 41 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त विमानात एकूण 78 प्रवासी होते.


या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या रशियन समितीच्या माहितीनुसार, “दुर्घटनाग्रस्त विमानात क्रू मेंबर्ससह 78 जण प्रवासी होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 11 जण जखमी आहेत.”

विमान दुर्घटनेतील गंभीर जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यातील तिघांचा प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मृतांना आदरांजली वाहिली असून, जखमींची विचारपूसही केली. विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी तातडीने समिती नेमण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget