श्रीमंत उमेदवार : ज्योतिरादित्य शिंदे तब्बल 334 कोटींचे मालक


12 मे रोजी लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सात राज्यातील 59 जागांसाठी मतदान होत आहे, ज्यात 979 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागणार आहे. सहाव्या टप्प्यातील 967 उमेदवारांपैकी 311 उमेदवारांकडे एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. मध्य प्रदेशातील गुणा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे सर्वात उमेदवार आहेत, तर रंगलाल कुमार हे सर्वात गरीब उमेदवार आहेत.

एडीआरच्या रिपोर्टनुसार, ज्योतिरादित्य शिंदे 374.56 कोटींच्या संपत्तीसह या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. तर भाजपचे पूर्व दिल्लीचे उमेदवार हे 147 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गुडगावमधून इंडियन नॅशनल लोकदलचे उमेदवार वीरेंद्र राणा यांच्याकडे 102.59 कोटींची संपत्ती आहे.

कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे?

वडील माधवराव शिंदे यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य राजकारणात आले. गुना या मध्य प्रदेशातील मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी 2002 साली निवडणूक लढली आणि निवडून आले. आतापर्यंत ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. 2012 ते 2014 या काळात त्यांना यूपीए सरकारमध्ये मंत्रीपदही देण्यात आलं होतं. त्यांची आत्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. तर यशोधरा राजे मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget