2600 रिक्षा चालकांचा परवाना जप्त

मुंबईत जवळचं भाडं नाकारणाऱ्या 2600 रिक्षा चालकांचा परवाना जप्त
 

मुंबई : जवळचं भाडं नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. वाहतूक विभागाच्या कारवाईत एकूण 5212 रिक्षा चालक कायद्याची पायमल्ली करताना आढळले. त्यात 2600 जणांचा परवाना जप्त करण्यात आलाय, तर 702 रिक्षा चालकांचं लायसन्स रद्द करण्यात आलंय. विशेष म्हणजे 171 रिक्षाही जप्त करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी ते 2 मे या काळात ही मोहिम राबवण्यात आली.

मुंबई उपनगरामध्ये रिक्षा चालकांची मुजोरी ही नवी नाही. याच्या अनेक तक्रारी वाहतूक विभागाला जात असतात. काही प्रमाणात त्यावर कारवाई होते, पण रिक्षा चालकांना त्याचा काहीही फरक पडत नाही. अडवून पैसे घेणे किंवा जवळचं भाडं नाकारणं हे अनुभव मुंबईकरांना नवे नाहीत. त्यामुळे या मुजोर रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी मोहिम सुरु केली आणि मुजोरी करणारांना चांगलाच दणका दिलाय.

उन्हाळ्यात अनेक प्रवासी थोड्या अंतरासाठीही रिक्षाची मागणी करतात. पण रिक्षावाल्यांना लांबचं भाडं हवं असतं. त्यामुळे मीटरप्रमाणे जाण्यासाठी रिक्षा चालक मुजोरी करत भांड नाकारतात. अन्यथा जास्त पैशांचीही मागणी केली जाते. पावसाळ्यातही हीच परिस्थिती असते. मुंबईत पाऊस सुरु असताना रिक्षा-टॅक्सी चालकांकडून अनेकदा जास्तीचे पैसे आकारले जातात आणि मुंबईकरांची लूट केली जाते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget