तरुणाची दादागिरी, भररस्त्यात 23 वर्षीय तरुणीची कॉलर पकडलीपुणे : कारला धडक दिल्याच्या रागातून तरुणाने चक्क तरुणीची कॉलर पकडून अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. विशेष म्हणजे या तरुणाला त्याच्या आईनेही साथ दिल्याचं बोललं जातंय. तरुणीला आणि तिच्या बहिणीला शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.

 तसेच दोघींना ‘पाहून घेतो’ म्हणून धमकीही दिली. याप्रकरणी स्वरुपा लोढा आणि मुलगा दर्शन लोढावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 23 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

दर्शन लोढा याने चारचाकी गाडीला धडक दिली असं म्हणून पीडित फिर्यादीच्या गाडीची चावी काढून घेतली. चावी घेतल्याची फिर्यादी यांनी विचारणा केली असता दर्शन लोढा याने अश्लील शिवीगाळ केली. तुझ्या सारख्या मुली खूप पहिल्या आहेत, असं म्हणत फिर्यादी तरुणीच्या कॉलरला पकडून जवळ ओढून घेत हाताला हिसका दिला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget