दुष्काळासाठी केंद्राकडून आणखी 2160 कोटी, आतापर्यंत 4248 कोटींची मदत

दुष्काळासाठी केंद्राकडून आणखी 2160 कोटी, आतापर्यंत 4248 कोटींची मदत

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ आणि केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 4248.59 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. या मदतीमुळे राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मोठ्या प्रमाणात वेग येण्याची अपेक्षा आहे.

मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये 1284 राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून 8 लाख 55 हजार 513 पशूधन दाखल झाले आहेत. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे चारा छावण्या हाच एकमेव पर्याय सध्या शेतकऱ्यांसमोर उरला आहे.

पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छेने आणि स्वखर्चाने सहा छावण्या सुरु केल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये पशूधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी अँड्रॉईड प्रणालीवरील ॲप विकसित करण्यात आलंय. त्याचा वापर करण्याचे निर्देश छावण्यांना देण्यात आले आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget