अवघ्या 21,000 रुपयांत बुक करा Hyundai ची 'ही' एसयूव्ही कार


मुंबई: ह्युंदाई मोटर इंडियाने आपली आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'वेन्यू' ची बुकिंग सुरु केली आहे. Hyundai Venue ही एसयूव्ही तुम्ही अवघ्या 21,000 रुपयांत बुक करु शकणार आहात. ह्युंदाई कंपनीने गुरुवारी ही माहिती दिली.

कंपनीतर्फे सांगण्यात आले की, ह्युंदाई वेन्यू या गाडीने लॉन्च होण्यापूर्वीच सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. आम्हाला विश्वास आहे की ही गाडी वाहन उद्योग क्षेत्रात एक नवा इतिहास बनवेल.'ह्युंदाई वेन्यू भारतातील आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि जागतिक उत्पादन सादर करण्यासाठी सज्ज असल्याचा पुरावा आहे'. 

एसयूव्ही वेन्यू बुकिंग करण्यासाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कुठल्याही डीलरच्या माध्यमातून बुक करु शकतात. ग्राहक केवळ 21,000 रुपयांद्वारे ह्युंदाई वेन्यू बुक करु शकतात.ह्युंदाई वेन्यू मध्ये कंपनीने 1.0 लिटरचं टर्बोचार्ज जीडीआय पेट्रोल इंजिन, 1.2 लिटरचं कापा पेट्रोल इंजिन आणि 1.2 लिटरचं डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. 

करामध्ये 6 स्पीड युनिट्सचं मॅन्युअल आणि 7 स्पीड युनिट्सचं डीसीटी ट्रान्समिशन मिळणार आहे. 

कंपनीला अपेक्षा आहे की, ही कार लॉन्च केल्यानंतर कंपनीच्या विक्रीतील आकड्यांत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. 


ह्युंदाई मोटरने स्थानिक भाजारात एप्रिल महिन्यात 42,005 वाहनांची विक्री केली जी गेल्यावर्षी 46,735 इतकी होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget