अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या 200 कर्मचार्‍यांनी घेतला श्रमदानात सहभाग कणसेवाडी येथे दिवसभर श्रमदान

संगमनेर ( प्रतिनिधी ) मा.शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला परिपूर्ण वाव देतांना तालुक्याचा ग्रामीण विकास,माती परिक्षण,दंडकारण्य अभियान,वृक्षसंवर्धन, पाण्याचे महत्व या विषयांवर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग देणार्‍या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या कर्मचार्‍यांनी कणसेवाडीत दिवसभर श्रमदान करुन जलसंवर्धनाच्या कामात सहभाग घेतला.
कणसेवाडी येथे पाणी फाउंडेशन च्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धे प्रसंगी आयोजित श्रमदान कार्यक्रमात अमृतवाहिनीच्या 200 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी दिवसभर श्रमदानात सहभाग घेतला. याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,आदिवासी सवेक प्रा.बाबा खरात,शिवाजी साकूरे, बाळासाहेब उंबरकर,संजय वर्पे,श्रीपद पोपळघट,नानासाहेब वर्पे,विजय पोपळघट,रमेश वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


आ.बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात गावोगावी नाला बर्डींग,सिमेंट बंधारे यांच्या माध्यमातून मोठे काम केले आहे.वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यात गावोगावी नागरिकांनी श्रमदानात मोठा सहभाग घेतला आहे.या कामात अमृतवाहिनीतील अभियांत्रिकी महाविद्यालय,पॉलिटेक्नीक,एमबीए, फार्मसी,आयटीआय,मॉडेल स्कूल,इंटरनॅशनल स्कूल मधील 200 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहभाग घेवून दिवसभर श्रमदान केले.
यावेळी अनिल शिंदे म्हणाले कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी जलसंधारणाचे महत्व ओळखून तालुक्यात पाणलोटाचे मोठी कामे केली. महाराष्ट्राचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी हाच वारसा जोपासतांना तालुका पाणीदार होण्यासाठी सातत्याने काम केले. अमृतवाहिनी संस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासतांना कायम ग्रामीण विकासाचे काम केले आहे.वॉटर कप स्पर्धेमुळे श्रमदानासह जलसंवर्धनाचे चांगले काम होत आहे.या कामात सहभाग देणे हा आनंद असून श्रमदानातून चांगल्या आरोग्याबरोबर रचनात्मक काम ही उभे राहणार आहे म्हणून नागरिकांनी आपल्या मोकळया वेळेत श्रमदानाला प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रा. बाबा खरात म्हणाले की,उन्हाची तमा न बाळगता एकच ध्यास आहे कि,भावी पिढी पर्यावरणदृष्ट्या सुखी व समृद्ध व्हावी. पाणी उपलब्ध करण्यासाठी सर्व गाव श्रमदानासाठी एकवटले आहे. तरुणाई , महिला, जेष्ठ नागरिक , ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून समपातळी चर , वृक्ष रोपणासाठी खड्डे , बांधबंदिस्ती ,साठवण तलाव दुरुस्ती इत्यादी कामे वेगाने चालू आहेत. भविष्यात जलसंधारणामुळे आवर्षणावर मात करता येईल.असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
अमृतवाहिनी संस्थेच्या कर्मचार्‍यांनी दिवसभर केलेले काम निश्चितच दिशादर्शक आहे. अशी भावना कणसेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget