आग्या मोहोळाच्या मधमाशांच तांडव; तब्बल 200 जणांवर हल्ला


वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणेमध्ये चार दिवसीय उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 151 शालेय विद्यार्थ्यांसह 200 जणांवर मधमाशांनी हल्ला चढवला. गुरुवारी दुपारी 4 वाजता मधमाशांनी विद्यार्थ्यांवर चढवलेल्या हल्ल्यात शिक्षकांसह 7 जण जखमी झाले आहेत.
शिबिराच्या पहिल्याच दिवशी गुंजवणे येथील समाजमंदिरात शिबिरार्थी मुलांची सोय करण्यात आली होती. विद्यार्थी गाडीतून उतरून मंदिरात जाऊन बसत होते. इतक्यात मंदिराशेजारी असणाऱ्या ‘वेळाच्या झाडा’वरील आग्या मोहोळातील मधमाशांनी मुलांवर अचानक हल्ला चढवला.

2 मे ते 5 मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड’ या चार दिवसीय उन्हाळी शिबिरात 151 शालेय विद्यार्थी, 34 स्वयंसेवक आणि 15 शिक्षक असे 200 जण सहभागी झाले होते.

या हल्ल्यानंतर सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून गुंजवणे आणि चिरमोडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. दरम्यान, जखमींवर करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget